ऑनलाईन टीम / नांदेड :
नांदेड जिह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये मोठी फळी तयार झाली आहे. माजी मंत्री व ज्ये÷ नेते भास्करराव पाटील-खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. तर खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपला रामराम ठोकणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला होत आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. या जागेवर काँग्रेसने रावसाहेब यांचा मुलगा तिजेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निवडणुकीत तिजेश अंतापूरकर यांचा विजय निश्चित आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. तसेच लवकरच मी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे खतगावकर यांनी म्हटले आहे.