पॉझिटिव्हीटी 1.28 टक्के : कवच कुंडल मोहिमेत लसीकरण लाखाजवळ.दोन मृत्यू, 264 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी /सातारा
जिल्हय़ात बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 90 जण बाधित आले असून गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी डिस्चार्ज वाढला असून 264 जणांना घरी सोडण्यात आले. नवरात्रोत्सवात सलग चार दिवस बाधितांचा आकडा शंभरखाली असून पॉझिटिव्हीटी रेट 1.28 टक्के इतका नोंद झाला आहे. दरम्यान, कवच पुंडल मोहिमेत जिल्हय़ात लसीकरणाचा आकडा 1 लाखांकडे निघाला आहे.
फलटणला सर्वाधिक 23 रूग्ण
बुधवारी रात्रीच्या अहवालानुसार 90 रूग्ण बाधित आले असून यात सर्वाधिक 23 रूग्ण फलटणला आढळले आहेत. तर सातारा तालुक्यात 16 आढळले आहेत. आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. फलटण 23 (37,250), सातारा 16 (51,692), खटाव 14 (25,756), माण 11 (17,878), कराड 5 (39,091), वाई 3 (15,724), महाबळेश्वर 1 (4,691), खंडाळा 7 (14,165), जावली 1 (10,003), कोरेगाव 7 (21,890), पाटण 0 (10,130), इतर 2 (2,147) असे एकूण 2,50,49 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.
लसीकरण 27 लाखांच्या पार
जिल्हय़ात गुरुवारी एकूण 16 हजार 195 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा वेग वाढत असून यामुळे जिल्हय़ात लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 27 लाख 1 हजार 297 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 2 हजार 363 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 98 हजार 934 एवढी झालेली आहे.
तीन मृत्यूंची नोंद
जिल्हय़ात गेल्या चोवीस तासात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. यात कराड व माण तालुक्यात प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे. आजअखेर जावली 224, कराड 1239, खंडाळा 194, खटाव 650, कोरेगाव 502, माण 417, महाबळेश्वर 89, पाटण 372, फलटण 686, सातारा 1515, वाई 396, इतर 88 असे एकूण 6372 मृत्यू झाले आहेत.
डिस्चार्ज वाढला
गेल्या चोवीस तासात डिस्चार्ज होणाऱया रूग्णांची संख्या वाढली असून 264 जणांना आज सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले. त्यामुळे सक्रीय रूग्णांचे प्रमाण आता 1396 इतके आहे.
जिल्हय़ात गुरुवारपर्यंत
- एकूण नमुने 21,72,521
- एकूण बाधित 2,50,251
- एकूण कोरोनामुक्त 2,41,775
- एकूण मृत्यू 6,372
- सक्रीय रुग्ण 1,396
जिल्हय़ात गुरुवारी
- बाधित 90
- मुक्त 262
- मृत्यू 02









