प्रतिनिधी / वेंगुर्ले:
सुपारीच्या झाडाच्या पानापासून पत्रावळी, द्रोण, प्लेट बनविण्याचा आगळा-वेगळा व्यवसाय करणाऱया वेतोरे येथील सौ. नाजुका नीलेश गावडे यांचा येथील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून सत्कार करण्यात आला.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे नवरात्रोत्सवात दरवर्षी नारी शक्तीचा सन्मान म्हणून वेगवेगळय़ा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱया महिलांचा सत्कार करण्यात येतो. वेतोरे येथील नाजुका नीलेश गावडे यांनी सुपारीच्या पानापासून द्रोण, पत्रावळी, चमचे, प्लेट आदी वस्तू बनविण्याचा आगळा-वेगळा व्यवसाय निवडून तो गेल्या चार वर्षात यशस्वी करुन दाखविला. त्याबद्दल त्यांचा लोकमान्य शाखा वेंगुर्लेचे शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ यांच्या हस्ते गुलाब पुष्प, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नीलेश गावडे, लोकमान्यचे चक्रपाणी गवंडी, प्रिया करंगुटकर, स्नेहल गावकर, सोनू कांबळी, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, माजी अध्यक्ष के. जी. गावडे आदी उपस्थित होते. सूचसंचालन स्नेहल गावकर यांनी केले, तर आभार चक्रपाणी गवंडी यांनी मानले.









