विशाल कदम / सातारा :
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या सेवेसाठी अविरतपणे लोकहितकर्तव्यदक्ष अशा प्रभाग 20 च्या नगरसेविका लीना राजू गोरे. प्रभागातील मतदारांना मुलभूत सुविधा देण्यासाठी त्या शेवटपर्यंत पाठपुरावा करतात. सर्वसामान्य घरातील कोणताही राजकीय वारसा अंगी नसताना लीना गोरे यांनी तब्बल साडेनऊ वर्ष नगरसेविका म्हणून लोकांची सेवा केली आणि त्या करत आहेत.
लीना गोरे यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांचे पती राजू गोरे यांच्या पाठिंब्यामुळे राजकारणात पंधरा वर्षापूर्वी सक्रीय झाल्या. त्यांनी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे यांच्याकडून सामाजिक कार्याचा वसा घेऊन आपल्या वॉर्डात त्याकाळी प्रारंभ केला. संक्रातीच्या हळदीकुंकू सोहळय़ापासून सुरुवात झालेले कार्य त्यांनी अविरतपणे सुरु ठेवले. वॉर्डातल्या महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु लागल्या. त्या सोडवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात अग्रभागी होत्या. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे आणि वहिनीसाहेबांचा त्यांच्यावर विश्वास. मनोमिलनाच्या काळात त्यांच्यावर दोन वेळा पाणी पुरवठा सभापतीपदाची धुरा दिली गेली. तर एकदा महिला व बालकल्याण सभापतीपदाची. त्या काळात त्यांनी पाण्याची समस्या शहरात कुठे उद्भवू नये म्हणून अतिशय चांगले काम केले. वॉर्डात आणि सध्याच्या प्रभागात रस्ते, पाणी, गटर, लाईट यासाठी प्रकर्षांने कामे केली. निधीसाठी संघर्ष करावा लागला. आपल्या प्रभागातील जनतेला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांची गैरसोय होता कामा नये यासाठी सभागृहात सत्ताधाऱयांना खडेबोल सुनावण्यात त्या कुठे कमी पडल्या नाहीत. एवढेच नाही तर पालिकेचे मुख्याधिकाऱयांच्या केबीनबाहेरही आंदोलन केले. कंदिल आंदोलन करुन लक्ष वेधून घेतले. प्रभागातील दलितांना त्यांच्या हक्काचा निधी मिळवून देण्यासाठी पालिकेत सातत्याने पाठपुरावा केला. आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत वाहन चालवण्याचा परवाना काढण्याचे शिबिर, आरोग्य शिबिर, मोती बिंदू शिबिरे, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबवले. तसेच दिव्यांगानाही पालिकेचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पुणे येथे रुग्णांना नेवून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करवून घेतल्या.

कोरोना काळात केले भरिव काम
जसा नेता तसा कार्यकर्ता याप्रमाणेच नगरसेविका लीना गोरे यांचे कार्य हे कोरोनाच्या काळात प्रभाग 20 मधील जनतेने पाहिले. एक महिला असून घरात न बसता कणखर होवून प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी मदतीला धावून गेल्या. भाजीपाला, धान्याचे किट घरपोहच पोहचवले. अर्सेनिक अल्बम या गोळय़ांचे वाटपही त्यांनी केले. प्रभागातील प्रत्येक घर अन् घर सॅनिटायझर करुन घेतले. ज्या घरात कोव्हिड रुग्ण आढळून आला त्यांच्या घरातल्यांना स्वतः फोन करुन आधार दिला. कोरोना रुग्णांना घरपोहच जेवणाचे डबे पुरवले. त्यांना रुग्णालयामध्ये येणाऱया समस्या दूर केल्या. त्याचा कुठेही त्यांनी गाजावाजा केला नाही. नागरिकांच्या हितासाठी त्या कामात गर्क राहिल्या.
पूरग्रस्तांना मदत त्यांच्या गावी जावून
कधीही फोटोबाजी वा बॅनरबाजी न करता लोकांच्या हितासाठी काम करत राहणे हीच वहिणीसाहेबांची शिकवण. त्यामुळे लीना गोरे यांनी 22 ऑगस्टच्या पावसाने चिपळूण शहरवासियांची दूरावस्था टिव्हीवर पाहिली अन् त्यांना रहावले नाही. त्या स्वतः प्रत्यक्ष तेथे गेल्या. त्यांनी तेथे जावून स्वच्छता मोहिम राबवली. पुरग्रस्तांना साहित्य दिले.
पती राजू गोरे यांच्यासह कुटुंबीयांची साथ
समाजकारण आणि राजकारणामध्ये लोकांचे प्रश्न सोडविताना कुटुंबाकडेही त्या तेवढय़ाच लक्ष देत होत्या. त्यांनी दोन मुलांना चांगले शिक्षण दिले, त्यांना घडवले. त्यांचे पती राजू गोरे यांची व त्यांच्या दोन्ही मुलांची त्यांना अमूल्य अशी साथ लाभली.
प्रभागातील महिलाभगिनी अन् निस्वार्थीपणे कायकर्ते बंधूंच्यामुळे मी इथपर्यंत पोहचले. श्रीराम स्वाध्याय परिवाराचे शरदभाई जानी यांच्या अध्यात्मिक सहभागामुळे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. प्रभागातील महिला भगिनी व निस्वार्थीपणे कार्य करणारे कार्यकर्ते बंधू यांच्या सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत आले आहे, असे आर्वजून नगरसेविका लीना राजू गोरे यांनी सांगितले.









