30 लाखाहून अधिक महसूल महिन्यासाठी येतो मात्र सोपोधारक म्हणतात फक्त 7 लाख
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा बाजारपेठेत सोपो म्हणजे महाघोटाळाच आहे. महिन्याकाठी सोपोवाल्याकडून 30 लाखाहून अधिक वसूली होते मात्र सोपोधारक फक्त 7 लाखच येतात असे पालिकेला सांगून आपली पोळी भाजू पाहतो. बाकी पैसे कोणाच्या खिशात जातात याची चौकशी व्हायला पाहिजे. पालिकेचा एकही रुपया सोपोधारकांनी दिला नसल्यास आपण त्याच्या विरोधात डिएमए व पोलिसांकडे तक्रार करणार.
म्हापसा पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमावा. पालिकेत नागरिकांची नाहरकत देण्यासाठी सतावणूक चालली आहे असा आरोप म्हापसा पालिकेचे नगरसेवक ऍड. शशांक सुभाष नार्वेकर व नगरसेविका कमल डिसोझा यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला. पालिका चालवायला जमत नसल्यास आमच्या हातात पालिका द्यावी आम्ही चालवून धाकवितो असे आवाहनही यादोघांनी यावेळी केले.
नगराध्यक्ष मुख्याधिकारी पालिकेत लक्ष देत नसल्याचा आरोप
आम्ही निवडून आज सहा महिने उलटले. म्हापशेकरांचो एकवट पॅनल निवडून आले. आम्ही म्हापशात सुधारणा करणार असे आश्वासन म्हापशेकरांना दिले. नगराध्यक्षांना जसा आम्ही पाठिंबा दिला होता तसा प्रशासनामध्येही आम्ही सहा जणांनी त्यांना पाठिंबा दिला. म्हापशाच्या सुधारणा करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला. पालिकेत आंतरिक सुधारणा व्हायला पाहिजे अशी माहिती नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱयांना दिली मात्र ते लक्ष देत नसल्याचा आरोप नगरसेवक ऍड. शशांक नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याचे उत्तर त्यांनी द्यावे.
नाहरकत दाखले देण्यास मारावे लागतात हेलपाटे
आज म्हापशातील नागरिकांची सतावणूक होत आहे. नाहरकत दाखला देण्यासाठी 3-4 महिने लागतात. 15 वेळा यायला सांगतात मग ते नागरिक कायदेशीर काम का करणार. अधिकाऱयांना पाया पडले तरीही दुर्लक्ष होते. मुख्याधिकाऱयांना सांगितल्यास ते दुर्लक्ष करतात. फाईल्स कुठे जातात हे कुणाला माहीत नाही. ऑनलाईन परवानाही देण्यास टाळाटाळ होते. आमची व्हेबसाईट चालत नाही, फोन नंबरही चालत नाही या गरजेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते असे ऍड. नार्वेकर म्हणाले.
मुख्याधिकाऱयांकडे पाच ठिकाणाचा ताबा
14 जुलै रोजी पहिली बैठक झाली होती त्यावेळी मुख्याधिकारी आजारी होते ते आजपर्यंत नाही आले तर अवघा तासभर येतात जातात. पाच ठिकाणचा ताबा ते सांभाळतात. म्हापसा ब गट नगरपालिका आहे. 35 हजार लोकवस्ती आहे, 26 हजार मतदार आहेत. मात्र येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. सहा महिन्याच्या कालावधीत एकही काम झालेले नाही. प्रशासन सांभाळता येत नाही तर तुम्ही हातात घेऊ नका. मगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दोघेच एक्सीरीयन आहेत अन्य कुणी नाही. त्यांना कुणीतरी शिकवायला पाहिजे. मुख्याधिकारी कधी येतात जातात हे कळत नाही.
वॉर्डात अद्याप वादळातील झाडे पडूनच
वादळ आले तेव्हा आम्ही झाडे कापण्याबाबत पत्रव्यवहार केला मात्र आजपर्यंत पडलेली झाडे तशीच पडून आहे. अग्निशमन दलाने आम्ही अत्यावश्यक वेळीच येतो असे सांगितले. नगराध्यक्षांनी म्हापशात सर्वत्र फिरून पाहणी करून प्रसिद्धी मिळविली मात्र प्रत्यक्षात काहीच केले नाही. याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे. झाडे अद्याप तशीच आहे. वॉर्ड 3 व 10 मध्येच झाडे कापली. थोडय़ा लोकांना अद्याप निवेदनपत्र लिहिता येत नाही त्यांची कामे होतात. पालिकेत रिकार्ड़ बुक नाही. कुठली फाईल कुठे जाते हे कोणाला माहीत नाही. नगराध्यक्ष व मुख्यधिकाऱयांनी यात लक्ष घालावे.
पालिका बैठकीचा थांगपत्ता नाही
पालिका कायद्यात बैठकीतबाबत स्पष्ट लिहिले आहे. वर्षाच्या आत 6 बैठका व्हायला पाहिजे मात्र आड 4 महिने उलटले तरी बैठक नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱयांना कायद्यानुसार पालिका सांभाळता येत नसल्यास त्यांनी आमच्याकडे कारभार सोपवावा जेणेकरून आम्ही पालिका योग्यरीत्या सांभाळू शकतो अशी माहिती नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी दिली.
मुख्याधिकाऱयांच्या गैरहजेरीत सही करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नाही- कमल डिसोझा
म्हापशाचे नागरिक म्हापसा पालिकेत येतात तर नागरिक सहा महिने झाले आम्हाला नाहरकत दाखला देत नसल्याचा आरोप करतात अशी माहिती म्हापसा पालिकेच्या नगरसेविका कमल डिसोझा यांनी केला. पालिकेत नगराध्यक्ष असतात मात्र त्यांना सही करण्याचा अधिकार नाही. मुख्याधिकारी आजारी आहेत त्यांच्याकडे पालिकेचा पाच ठिकाणचा ताबा आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील म्हापशाचा ताबा काढावा व म्हापशात नवीन पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी कमल डिसोझा यांनी केली. यांच्या आजारामुळे म्हापसा वासियांना त्रास का. आमदारांना तोच मुख्याधिकारी पाहिजे.
म्हापशात सोपो धारक म्हणजे महाघोटाळा
म्हापसा बाजारपेठ प्रसिद्ध असून याच अंधाधूंदी झालेली आहे. नवीन सोपोधारक जूनपासून सुरू झाला आहे. 3 महिने झाले कंत्राटनुसार बँक हमी द्यायला पाहिजे ती दिली नाही. 11 महिन्याचा महसूल व 18 टक्के जीएसटीसुद्धा दिलेली नाही. पालिकेने ती दिली नाही याला मुख्याधिकारीच जबाबदार आहे. 13 लाखापैकी फक्त 7 लाख दिले व इतर माफ करावे असे पत्र दिले आहे. आपण अवघ्याच दुकानाचे भाडे घेतो असे म्हटले आहे. सोपोधारक फळविक्रेत्याकडून प्रत्येकी 60 रुपये मासळी विक्रेत्याकडून टोपली प्रमाणे पैसे घेतात. त्याची येणावळ 30 लाखवर आहे. आणि 12 लाख देम्यास रडतात. आपण मार्केट कमिटीवर आहे. एका विक्रेत्याकडून 20 रुपये घ्यायला पाहिजे. मास विक्री लाईनमध्ये 60 विक्रेते बसतात, जेके व्हाईन 100 विक्रेते बसतात. भाजी मार्केट 256 आतमध्ये बसतात. बाहेर कांदे बटाटे विकणारे 150, पॅरेडाईज फार्मसी 135, मटकी बाजार 130, धाकुली पुढे 60, फळविक्रेते 82, कॉफी कॉर्नर लाईन 15, फउले विक्रेते 35, टेलर 10, मासळी विक्रेते 250, एकूण 1400 विक्रेते होते. मात्र सोपो धारक फक्त 700 सांगतात. म्हापशात सोपो हा महाघोटाळा आहे. येथूनच मोठा महसूल येतो. सोपो धारक स्लीप देत नाही यात शुक्रवारचा बाजार धरला नाही. या सोपोवाल्यावर कारवाई करा अन्यथा आपल्याकडे द्या आपण 2 लाख अधिक देतो.
विकासकामाचा आढावा घेण्यासाठी आम्ही 6 महिने थांबलो- ऍड. शशांक नार्वेकर
आमदार जोशुआ डिसोझाचा अडीच वर्षाच्या कालावधीत तार नदीचा प्रश्न आणि एक उद्घाटन वगळता आपण त्यांना कुठेच पाहिले नाही. ते आहे की नाही हे सांगणेही कठीण आहे. प्रशासनची जबाबदारी नगराध्यक्ष मुख्याधिकाऱयांची आहे. हे काम त्यांनी करून घ्यावे. आम्ही 6 महिने थांबलो आज आम्ही 35 वर्षे पालिकेत आहेत आम्ही वॉर्डात किती कामे केली हे लेखी सांगू शकतो मात्र येथे बेवर्तन चालण्याचा आरोप यावेळी नगरसेवक ऍड. शशांक नार्वेकरांनी केला.
काही नगरसेवक पैसे घेतात याबाबत पोलीस तक्रार करणार- कमल डिसोझा
सोपो धारक स्लीप देत नसल्यास त्याला सोपो देऊ नका असे आवाहन नगरसेविका कमल डिसोझा यांनी केले. काही नगरसेवक विक्रेत्यांकडून पैसे घेतात हे खरे असल्याचे ऍड. शशांक नार्वेकर यांनी सांगितले. एका जागेसाठी 3 हजार रुपयांची मागणी होते. विक्रेत्यांनी सोपोवाल्यांना पैसे देऊ नये व यासाठी सर्वांनी याविरोधात एकत्रित येऊन आवाज उठवावा असे आवाहन ऍड. नार्वेकर यांनी केले. आपण याबाबत डिएमए व पोलीस तक्रार करमार असल्याची माहिती कमल डिसोझा यांनी दिली. मुख्याधिकाऱयांची बदली करावी. पार्किंग व सोपोचा करार योग्यरीत्या केला नसल्याचा आरोप यावेळी कमल डिसोझा यांनी केला.









