‘आफत-ए-इश्क’ ओटीटीवर प्रदर्शित होणार
अभिनेत्री नेहा शर्मा सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘आफत-ए-इश्क’मुळे चर्चेत आहे. नेहाने अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आफत-ए-इश्क हा चित्रपट 29 ऑक्टोबर रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे तिने म्हटले आहे.

इंद्रजीत नट्टोजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ‘लिजा, द फॉक्स-फेयरी’ या हंगेरीयन चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची निर्मिती झी-5 स्टुडियोजकडून करण्यात आली आहे. चित्रपटात नेहासोबत दीपक डोबरियाल, अमित सियाल, नमित दास आणि इला अरुण हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘आफत-ए-इश्क’ लल्लो आणि तिच्या खऱया प्रेमाच्या शोधाची कहाणी आहे. नेहाने लल्लो ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
कशाप्रकारे अनेक मृत्यूनंतर लल्लो मुख्य संशयित ठरते हे चित्रपटात दर्शविण्यात आले आहे. मुख्य व्यक्तिरेखा एका प्राचीन अभिशापाशी जोडली गेली आहे. या शापामुळे तिच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होत असते. या चित्रपटात प्रेक्षकांनी अनेक नाटय़मय घडामोडी पहायला मिळतील.









