प्रतिनिधी/ बेळगाव
हिरा टॉकीजजवळ खुल्या जागेत अंदर-बाहर जुगार खेळणाऱया आठ जुगाऱयांना मार्केट पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याजवळून 85 हजार 890 रुपये रोख रक्कम, 9 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून आठ जणांना अटक केली.
त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आठजण स्थानिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.









