प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील शाहूपुरी उपनरातील सरस्वती कॉलनीत एकाने आजारास कंटाळून राहत्या घरात स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याची खळबळजनक घडली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात स्वतःचा गळा कापून घेतला होता. ही घटना लक्षात आल्यावर त्यांना तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
गोविंद गोवर्धनदास दारा (वय 58, रा. सरस्वती कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दि. 8 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी स्वतःचा गळा कापून घेतला. ही घटना निदर्शनास आल्यावर कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरु करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिप्ती सपकाळे यांनी खबर दिल्यानंतर या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालार कदम करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.