प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून विक्रम वाघमारे या वीट भट्टी कामगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सांगली ग्रामीण पोलीसानी या ठिकाणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत हकीकत अशी की, मयत विक्रम वाघमारे आणि पिंगळे यांच्यात पूर्वीचा वाद होता. या वादातून न्यायालयीन खटलाही उभा राहिला आहे. हा खटला मागे घ्या म्हणून विक्रम वाघमारे शनिवारी दुपारी दारूच्या नशेत पिंपळे यांच्या घरासमोर जाऊन दंगा करत होता. त्यातून वाद होऊन वाघमारे यांचा खून करण्यात आला आहे. ही घटना घडल्याची समजताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले तर वाघमारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.