ऑनलाईन टीम / सातारा :
खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ पुणे-बेंगळूर महामार्गावरून अमली अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या एकाला राजगड पोलिसांनी आज पहाटे अटक केली. त्याच्याकडून 6 किलो चरस जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईहून गोव्याकडे निघालेला एक प्रवासी अमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती राजगड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. खेड शिवापूर टोलनाक्यानजीक एका खासगी ट्रव्हल्सने प्रवास करणाऱया प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मूळचा नेपाळचा असलेल्या एका प्रवाशाकडे 6 किलो चरस आढळून आला. पोलिसांनी या प्रवाशास अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.