ऑनलाईन टीम
भाजपानं आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली. या कार्यकारिणीत भाजपने लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचाही समावेश केला आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. पंतप्रधानांनंतर दुसरं नाव पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं आहे. तर तिसरं नाव मुरली मनोहर जोशी यांचं आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते पक्षाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं दिसून येत आहे. गेल्या वेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.
मोदी यांनी सत्तेवर येताच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक बनवून मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला काढल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. आता मात्र या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पक्षानं पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं आहे.
तर, या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांना धारेवर धरले आहे. त्यासोबतच पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या जबाबदारीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यासोबत विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
त्यासोबत पदाधिकारी म्हणून देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री), विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), हीना गावित (राष्ट्रीय प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्य मोर्चा), यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









