बेळगाव : इंदोर (महू) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर संचालनालय शूटींग चॅम्पियनशिपमध्ये राधिका रविकुमार पुजारीने 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.
राधिका ही बीके मॉडेल हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असून, शाळेत असताना तिला एनसीसी ऑफिसर रवी घाटगे यांनी एअर रायफल शूटींगसाठी प्रोत्साहित केले होते. नववीत असताना दिल्लीतील थलसेना कॅम्पसाठी तिची निवड झाली होती. हुबळी शूटींग अकॅडमीमध्येही तिची निवड झाली. तिला रविचंद्र बाळेहोसूर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. आतापर्यंत तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविले असून दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ, त्रिवेंद्रम, कोचिन येथील एअर रायफल शुटींगमध्ये भाग घेतला आहे.
सध्या ती केएलई कॉलेजमध्ये शिकत असून, तिला प्रभाकर कोरे, एनसीसी कमांडिंग ऑफिसर राजीव सहानी, ऍडम ऑफिसर कर्नल नंदकुमार यांच्यासह इतरांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळत आहे.









