सलग दुसऱया महिन्यात सकारात्मक स्थिती- विविध क्षेत्रात पुन्हा सुरु झाली भरती
नवी दिल्ली
मॅन्युफॅक्चरिंगप्रमाणे सेवा क्षेत्रातही स्थिती सुधारत असल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. बदलाचे धोरण स्विकारल्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये सेवा क्षेत्राला गती मिळाली. यातून अनेक कंपन्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या.
आयएचएस मार्केट सर्व्हिसेस पर्चेसिंग इंडेक्स (पीएमआय) सप्टेंबर महिन्यात 55.2 वर राहिला. हा एक महिन्याअगोदर ऑगस्टमध्ये 18 महिन्यांचा उच्चांक प्राप्त करत 56.7 वर पोहोचला होता. याप्रकारे आयएचएस मार्केट सर्व्हिसेस पीएमआय 50 पेक्षाअधिक राहिला आहे.
देशातील बाजारात वाढली मागणी
एका खासगी सर्व्हेक्षणामधून देशातील बाजारात विविध गोष्टींना मागणी वाढली आणि कोरोनाशी संबंधीत नियमावलीत सवलत मिळत गेल्याने सेवा क्षेत्रातील प्रगती सलग दुसऱया महिन्यातही कायम राहिल्याचे सर्वेमधून सांगण्यात आले आहे.
कंपन्यांना नवीन काम
कोविड संकटामुळे प्रभावीत झालेल्या वातावरणामध्ये काही प्रमाणात सध्या सुधारणा दिसून येत आहे. यामुळे बाजारातील कंपन्यांमध्ये नवी कामे मिळाल्याने रोजगार निर्मिती होत असल्याचे आयएचएस मार्केटचे अर्थविभागाचे असोसिएट्स संचालक डी लीमा यांनी म्हटले आहे.
कंपन्यांचा कल सकारात्मक
कोविड संकटानंतर सावरत आज बाजार पुन्हा नव्याने सावरत असून कंपन्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
यामध्ये महागाईची चिंता सर्वसामान्यांसह अन्य उद्योगजगताला राहणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
सेवा क्षेत्रात नवीन भरती
सप्टेंबरमध्ये चांगली बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सलग नवव्या महिन्यापासून कपातीचे सत्र सुरु असणाऱया सेवा क्षेत्रात कार्याला वेग आला आहे. उद्योग कारखाने सुरू झाले असून नव्याने भरतीत वाढ होताना दिसत आहे.









