बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेसने राज्य भाजप सरकारला कावेरी नदीवर होणाऱ्या मेकेदातू जलाशयाचे काम लवकर सुरू करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे, असे न झाल्यास काँग्रेस राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, “केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सरकार मेकेदातू सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प हाती का घेत नाही?”, असा सवाल उपस्थित केला आहे.
रविवारी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले होते की मेकेदातू प्रकल्प कर्नाटकचा घटनात्मक अधिकार आहे आणि तामिळनाडूने ते थांबवण्याचा प्रयत्न करू नये. “राज्य सरकार हा प्रकल्प हाती घेण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे बोम्माई पुढे म्हणाले.