शाहुवाडी/प्रतिनिधी
कापशी ता. शाहूवाडी येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा आज सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. आरव राकेश केसरे असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. आरवचा मृतदेह त्याच्या राहत्या घरापासून शंभर फूट अंतरावर आढळला. चिमुकल्या बालकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात शोककळा पसरली असून या घटनेचा तपास त्वरीत करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. तर, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरव हा तीन ऑक्टोंबर रोजी बेपत्ता झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून शंभर फुट अंतरावर ठेवण्यात आल्याची प्राथमिक चर्चा असून सकाळी ही घटना निदर्शनास आली. जिल्ह्यात मृत बालक होण्याची ही दुर्दैवी दुसरी घटना घडल्याने पालक वर्गातही भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा तपास हे पोलिसांच्या समोर एक आव्हान उभे राहणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









