वार्ताहर/ लोणंद
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी व अन्न औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात सुमारे एक लाख 86 हजार रूपये किमतीचा साठा जप्त करुन एकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी लोणंद येथील गोटेमाळ परिसरात एका ठिकाणी अवैधरित्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर यांनी याबाबतची माहिती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना देऊन अन्न व औषध प्रशासन विभाग साताराचे अधिकाऱयांशी संपर्क करुन त्यांना बोलावून घेत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभाग साताराचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोणंद पोलीस स्टेशनची टीम दोन पंच असे पोलीस ठाण्यातुन सदर ठिकाणी रवाना होवुन संयुक्तपणे धाड टाकुन कारवाई करुन बंदी असलेले विमल, आर.एम.डी. व हिरा कंपनीचे एक लाख 86 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन कारवाई करून सागर नाथाजी शिंदे (रा. लोणंद ता खंडाळा) या आरोपीस ताब्यात घेतले.
कारवाईत सपोनि विशाल वायकर, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलीस हवालदार अविनाश नलवडे, पो. कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, महेश सपकाळ, सागर धेंडे, अभिजित घनवट, सिद्धेश्वर वाघमोडे, विजय शिंदे, गार्डी, तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा येथील ओ. ओ. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, आर. आर. शहा यांनी सहभाग घेतला असुन पुढील तपास स्वाती पवार करीत आहेत.