सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत १११ मुली घेतल्या दत्तक : एकूण ३५०००० रुपयाची कायमस्वरूपी देणगी
प्रतिनिधी / ओटवणे:
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ विद्यार्थिनी दत्तक घेऊन राज्यात रेकॉर्ड केलेल्या पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी पुन्हा केरवडे कर्याद नारुर नं १ या शाळेतील दोन विद्यार्थिनी दत्तक घेऊन शैक्षणिक बांधीलकी सुरूच ठेवली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश कविटकर, मुख्याध्यापक चंद्रकांत धुरी, ॲड. किशोर शिरोडकर, माजी सरपंच तुषार परब, पदवीधर शिक्षक सुरेश गुंजाळ, प्रकाश कडव, श्रीम. दिपा परब, विजयिता परब, सुचिता राणे, सविता कविटकर, रेश्मा परब, उज्ज्वला कविटकर, निता कविटकर, नारायण वरक, पालक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
ओवळीये गावचे सुपुत्र असलेले आंबोली निवासी चंद्रकांत सावंत मठ प्राथमिक शाळा नं. २ मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चंद्रकांत सावंत यांनी समाजहितासाठी गेल्या दोन दशकापासून केलेले शैक्षणिक व सामाजिक सर्वोत्कृष्ट कार्य शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्शवत आहे.