उचगाव / वार्ताहर
माहेरहून पंधरा लाख रुपये आणले नाहीत म्हणून पती, सासू, सासरा, दीर, जाऊ, नणंद आणि आत्तेसासू यांनी मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची फिर्याद गांधीनगर पोलीसांत सोनल राकेश चंदवाणी (वय ३६, रा. शिरु चौक, गांधीनगर) यांनी दिली. याबाबत राकेश मुरलीधर चंदवाणी, मुरलीधर कन्हैयालाल चंदवाणी, सरला मुरलीधर चंदवाणी, मुकेश मुरलीधर चंदवाणी, रिचा मुकेश चंदवाणी सर्व रा. गांधीनगर गिता सनी वधवा आणि कविता शितलदास दुलानी दोघी रा. कोल्हापूर अशा सातजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की, यातील फिर्यादी सोनल यांचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी व्यवसायासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये आणि दुचाकी गाडी घेण्यासाठी पंचाहत्तर हजार रुपये घेऊन ये असा तगादा पती, सासू, सासरा, दीर, जाऊ, नणंद आणि आत्तेसासू यांनी लावला. त्यानंतर मुलगा झाल्यानंतर त्याच्या कार्यक्रमासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये घेऊन ये अशी मागणी त्यांनी केली. पैसे आणले नाहीत म्हणून या सर्वांनी सोनल यांचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरु केला. त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोनल यांनी गांधीनगर पोलीसांत फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोलीस हे़डकॉन्स्टेबल पाटील करत आहेत.