सांगेलीत भाजपा आणि शिवसेनेकडून स्वतंत्र लोकार्पण कार्यक्रम
ओटवणे / प्रतिनिधी:
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे भाजपा पाठोपाठ शिवसेकडूनही लोकार्पण करण्यात आले. एकाच रुग्णवाहिकेचे दोन वेळा झालेले लोकार्पण सांगेली दशक्रोशीत सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या दोन्ही रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमाला सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भाजपच्यावतीने बुधवारी सायंकाळी उशिरा गिरिजानाथ मंदिर येथे माजी महिला व बालकल्याण सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या पल्लवी राऊळ यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रामा राऊळ, बाळा राऊळ, भाई राऊळ, आनंद राऊळ, सुनिल सावंत, लक्ष्मण सावंत, शिवा लाड, माजी सैनिक शशिकांत पाटकर, दीपक कदम आदी उपस्थित होते.
तर शिवसेनेच्यावतीने गुरूवारी सकाळी कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सांगेली सरपंच रमाकांत राऊळ, देवस्थान कमिटीचे सचिव पंढरीनाथ पु राऊळ, शिवसेनेचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, उपविभाग प्रमुख संतोष राऊळ, महीला विभाग प्रमुख सुजल रेमुळकर, शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के, ग्रामपंचायत सदस्य दीपक सांगेलकर, ओवळीये सरपंच विनायक सावंत, बबन सांगेलकर, प्रभाकर राऊळ, राजन राऊळ, रमेश सावंत, माडखोल शाखाप्रमुख विजय राऊळ, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, विठ्ठल सनाम, सुभाष रेमुळकर, सचिन सावंत, कृष्णा लाड, अरुण रेडीज, संतोष नार्वेकर, विलास राणे, पंढरी राणे, दिलीप राऊळ, रामशाम राऊळ, राजेंद्र सावंत, रामा राऊळ, धोंडी राऊळ, चंद्रकांत राऊळ, प्रकाश सनाम, सुरेश सांगेलकर आदी उपस्थित होते.