अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 27 सप्टें. 2021 स. 11.30
● रविवारी रात्रीच्या अहवालात 147 बाधित
● एकूण 6 हजार 591 जणांची तपासणी
● रविवारी तपासण्यांचा वेग कमी
● लसीकरणाची गती वाढली
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला कोरोना संसर्गाचा कहर सप्टेंबर महिन्यात चांगलाच आटोक्यात आलेला असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बाधित वाढीचा आलेख दीडशेच्या खाली घसरला आहे. गेले दोन दिवस बाधित वाढ दीडशेच्या खाली येत असून, जिल्ह्यातील स्थिती आटोक्यात येत असल्याचा मोठा दिलासा जिल्हावासीयांना लाभलेला आहे. यामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा, फलटण, कराड, खंडाळा, खटाव, माण सह सर्वच तालुक्यात बागेत वाढ मंदावली याचा दिलासा लाभलेला आहे. फक्त तीन तालुक्यात दोन अंकी व इतर तालुक्यामध्ये एक आणखी वाढ आहे. यामध्ये जावली महाबळेश्वरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे.
रविवारी अहवालात 147 बाधित
रविवारी एकूण 6 हजार 591 जणांची तपासणी करण्यात आली आहे. दर रविवारी तपासण्यांचा वेग तरी कमीच असतो. त्यामुळे बाधित वाढ कमी राहते. मात्र जिल्ह्यात शनिवारपासून रविवारी देखील बाधित वाढ दीडशेच्या खाली घसरली असल्याचा मोठा दिलासा असून रविवारी फक्त 147 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर देखील खाली घसरलेला आहे.
आरोग्य विभागावरचा ताण कमी
कोरोना बाधित वाढ मंदावत असल्याने आरोग्य विभागावरचा ताण कमी झाला आहे. प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या देण्यात येत नाही. मात्र ती कमीच आहे. अनेक रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरण व होम आयसोलेशन मध्ये आहेत. सध्या आरोग्य विभागाने लसीकरणा कडे मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले असून जिल्ह्यात 24 लाखाच्यावर नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या देखील 17 लाखाच्या वर गेलेले असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही सात लाखाच्या नजीक आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 20,49,565
एकूण बाधित 2,47,651
एकूण कोरोनामुक्त 2,38,169
मृत्यू 6,081
उपचारार्थ रुग्ण 5,840
रविवारी जिल्हय़ात
बाधित 141
मुक्त 146
मृत्यू 00









