अभिनेत्री सुरेखा कुडची हे नाव महाराष्ट्राला नवं नाही, 1990 पासून अभिनयाच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमा, मालिकांतही काम करत लोकप्रियता मिळवली आहे. मराठी सिनेमांमध्ये सासुची माया, पोलीसाची बायको, भरत आला परत, खुर्चीसम्राट, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीण यांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी 50 मराठी आणि हिंदी सिनेमांत काम केले आहे. याशिवाय देवयानी, रुंजी, नवरी मिळे नवऱयाला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी काम केले आहे. नुकतेच स्वाभिमान या मालिकेतही त्यांनी काम केले होते. आता आपल्याला त्या कलर मराठी वाहिनीचा दर्जेदार शो बिग बॉस या कार्यक्रमातून भेटीला आल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील अभिनय क्षेत्रात हे एक नावाजलेले नाव आहे. सध्या बिग बॉस मधील सहभागी स्पर्धक बघता बिग बॉस च्या घरातील त्या एक मजबूत दावेदार आहेत. आणि मुख्य म्हणजे घरातील इतर मंडळींपेक्षा वयाने आणि अनुभवाने सुद्धा सिनिअर आहेत.
सध्या ज्या प्रमाणे इतर मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यात बऱयाच वेळा एकमेकांच्या मतांचाआदर केला जात नाही. हे पाहुन सुरेखाने कड़क शब्दात घरातील मंडळींना चपराक लगावली.
अतिशय स्पष्ट शब्दात ‘अरे ये थोड़ातरी मान द्या बाकीच्याना, काही कळत की नाही ? त्याच बरोबर घरातल्या गोष्टी सर्व मंडळी कशा करू शकतात याबद्दल सुद्धा सांगितले ‘शक्य असेल तर स्वतःचा चहाचा कप आणि स्वतःची प्लेट स्वतः घासा..’ हे सुरेखाचे रूप पाहून सर्व मंडळी शांत झाली. प्रेक्षकांनी आतापर्यंत शांत सुरेखा पहिली होती आता परिस्थिती नुसार सुरेखाची वेगवगळी रुपे लवकरच पहायला मिळतील याची उत्कंठा प्रेक्षक वर्गाला लागली आहे.