ओटवणे / प्रतिनिधी:
शिवसेनेच्या भटक्या विमुक्त सेलच्या सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी केसरी येथील तुकाराम जंगले यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र तुकाराम जंगले यांना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अशाेक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपतालुका प्रमुख राघाेजी सावंत, गजानन नाटेकर, प्रशांत काेठावळे़, आंबोली उपविभाग प्रमुख आंनद वरक, दशरथ काेकरे, विलास जंगले, देवसु शिवसेना शाखाप्रमुख गाेविंद सावंत आणि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी तुकाराम जंगले यांनी सावंतवाडी तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजाला संघटित करून शिवसेनेच्या माध्यमातून या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच आपली या पदावर निवड केल्याबद्दल सर्व शिवसेना पदाधिकारी यांचे आभार मानले.
Previous Articleबांदा गांधीचौक नवरात्रौत्सव नियोजन बैठक शनिवारी
Next Article गोकुळच्या विस्तारीकरणास मंजुरी









