आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचा आप पक्षाला टोळा : म्हापशात जुने आझिलोत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
प्रतिनिधी / म्हापसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारमार्फत विविध उपक्रम राबविले जाताहेत. यापूर्वीच गोव्यात कौशल्य विकासाच्या माध्यमातून विविध गोष्टी सुरू केल्या आहेत. आणि काहीजण दिल्लीतून येऊन कौशल्याच्या बाता मारतात. अर्धवट ज्ञान घेऊन ग्राऊंड रिपोर्ट अभ्यास न करता घोणषा करतात. जो पक्ष गोव्यात एकही जागा जिंकू शकत नाही तो आम्हाला शिकवितोय अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधताना दिली.
काल गुरुवारी जुने आझिलो वास्तुत येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते कार्यक्कत बोलत होते. कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय व जेई व्हिप्रो हेल्थ केअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाचे संचालक दीपक देसाई, डॉ. जोस डिसा, आयएएस सी.आर. गर्ग, डॉ. राजेंद्र धुमे, डॉ. राजेंद्र बोरकर व अनुप कुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
जेव्हा सरकारी नोकऱया द्यायचे म्हटल्यास प्रत्यक्षात वास्तू उभारावी लागते. गोष्टींचे मूल्यांकन करूनच पदे निर्माण केली जातात. भाजप सरकारने जो शब्द दिला आहे तो पाळणार. मात्र काहीजण मते मिळविण्यासाठी घोषणाबाजी करतात पण गोमंतकीय सुज्ञ आहेत. येत्या नोव्हेंबरच्या 30 तारखेपूर्वी सरकारी नोकऱयांबाबत आश्वासने जाग्यावर पडतील. कारण मुख्यमंत्री त्यांच्यावरही दबाव असून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरतीवर सरकारतर्फे भर असेल. अशी ग्वाही विश्वजीत राणे यांनी दिली.
भाजपची आश्वासने सत्यात उतरतील
मुख्यमंत्र्यांनी सरकारी नोकऱयांविषयी ज्या घोणषा केल्या आहेत त्या 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व गोषअटी जाग्यावर पडतील. भाजपने जी आश्वासने दिली ती सत्यात उतरतील. दुसरीकडे दिल्लीतील एक पक्ष येऊन गोव्यात प्रत्येक घरात रोजगार देऊ अशा वल्गणा करतो. जे व्यावहारिकदृष्टय़ा अशक्य. मुळात संबंधितांनी अगोदर कृती योजना सादर करावा आणि नंतर बाता माराव्यात असे आव्हान आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आम आदमी पक्षाचे नाव घेता टोला मारला.
बोलण्यापेक्षा भाजपने कामे करून दाखवली
दिल्लीतील काही नेते गोव्यात येऊन प्रत्यक्षात उतरू शकत नाही. अशा घोणषाबाजी करतात. मात्र भाजप बोलण्यापेक्षा कामे करून दाखवितो. गोव्याची जनता ही सुजाण असून लोक याला बळी पडणार नाहीत. आरोग्य क्षेत्रात भाजपने शाश्वत विकास केला असून कोविडची स्थिती भाजपने उत्तमरीत्या हाताळली. मात्र ज्यांनी दिल्लीत कोविडच्या काळात सत्यानाश केला ते आम्हाला कोविड नियोजनाविषयी धडे देताहेत ही हास्यास्पद बाब असल्याची उपहासात्मक टीका आरोग्य मंत्री तथा कौशल्य विकास मंत्री डॉ. विश्वजीत राणे यांनी केली.
हृदयविकाराच्या झटक्यासाठी खास उपाययोजना
सुपरस्पेशालिटी इस्पितळात रुग्णांना ‘स्ट्रोक अटॅक’ साठी तिथल्या तिथे उपचार मिळावेत यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी परराष्ट्र व्यवहार विभागाशी बोलून मियामी विद्यापीठाशी करार केला जाणार आहे. कोविडमुळे हे काम लांबणीवर पडले असून सर्व तयारी पूर्ण झाल्या आहेत याकडे आरोग्य मंत्र्यांनी लक्ष वेधले.









