प्रतिनिधी/ तिसवाडी
कुंभारजुवे येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुंभारजुवे यांच्या श्री गणेशमूर्तीचे रविवारी दि. 19 रोजी संध्याकाळी 7 वा. अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.
सकाळी गणपती पूजन, धार्मिक विधी, आरती व तिर्थप्रसाद होणार आहे. यावेळी तरूण भारतचे छायाचित्रकार सतीश गोविंद कुंकळकर व सौ. संप्रिता सतीश कुंकळकर यांनी यजमानपदी गणपती पुजन, धार्मिक विधी केल्या. त्यानंतर दुपारी 12 वा. रामायसती आरती मंडळातर्फे आरती झाल्या. त्यानंतर संध्याकाळी 7 वा. पानवेल रायबंदर येथील पानवेलकर भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी भजनी कलाकार सुदन फडते, नामदेव म्हार्दोळकर, सुहास नाईक, पोपटलाल काणकोणकर, संदीप गणपत नाईक, सतीश कुंकळकर, बेतू कवळेकर व त्यांना हार्मोनियम साथ राजेंद्र काणकोणकर व पखवाज साथ नितेश नाईक यांनी केली होती.
रविवार दि. 19 रोजी सौ. व श्री. बाबू (लक्ष्मण) रायकर हे यजमानपद भूषविणार आहेत. तरी कोरोना महामारी असल्याने कोरोनाचे पालन करावे. सर्व भाविकांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









