नेपाळच्या एका महिलेचा समावेश, कोल्हापुरातील पोलीस पथकाने केली कारवाई
प्रतिनिधी/गडहिंग्लज
गडहिंग्लज शहरातील डॉक्टर कॉलनीतील गणेश लॉजवर कोल्हापूर येथील पोलीस पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन महिलांना ताब्यात घेतले. तर, या प्रकरणी लॉजचा मालक अशोक भिमराव गवळी (वय 62 रा. गडहिंग्लज), लॉजचा मॅनेजर अभिजीत अशोक गवळी (32 रा. गडहिंग्लज), अक्षय मनोहर शिंदे (27 रा. शेंद्री रोड), विशाल सिध्दराम दोनवाडे (29 रा. मेटाचा मार्ग गडहिंग्लज) आणि चंदू (पूर्ण नाव माहिती नाही) अशा पाच जणावर कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली.
गडहिंग्लज शहरात अलीकडे वेश्या व्यवसाय फोफावल्याची चर्चा होती. त्याला या कारवाईने पुष्टी मिळाली असून कोल्हापूर येथील विशेष पथकाने काल, गुरूवारी रात्री टाकलेल्या धाडीत नेपाळ, कराड आणि निपाणी येथील तिन महिलांना असाहय्यतेचा गैरफायदा घेवून पैशाचे अमिष दाखवून आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन व्यवसायात गुंतवले होते. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी असा विविध प्रकाराचा मिळून 85 हजार 100 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. हवालदार मिनाक्षी पाटील यांनी यांची फिर्याद गडहिंग्लज पोलिसात दिली असून संबंधीत संशयिताना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके हे करीत आहेत.