सातारा / कुडाळ
जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले असल्याची घटना घडली. पीडित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचे आमिष देऊन मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर मेढा पोलीस ठाण्यात मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार प्रमोद कृष्णा कांबळे केशव तुकाराम महामुळकर अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर दिलीप दिनकर महामुलकर असे सहा जणांवर अतिसंवेदनशील गुन्ह्याची तक्रार दाखल नाकारण्यास 25 हजार रुपयांचे आमिष दाखवून पीडित कुटुंबीयांना धमकावून प्रकरण मिटून घेण्यास सांगणारे असे सहा जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीस दोन दिवसापूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ वय – 65 वर्षे राहणार नेवेकरवाडी ता.जावळी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
आणखीन यामध्ये सहा आरोपींचा समावेश झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीदेखील आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला देखील समज देखील देण्यात आली होती. मात्र ज्यावेळी नराधम आरोपी बबलिंग सपकाळ याने विकृतीचा कळस गाठला व हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीच्या केलेला कृत्यास पाठीशी घालत पंचवीस हजार रुपये आमिष दाखवत संबंधित पीडित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास दबाव टाकला प्रकरणी सहा जणांच्या विरोधात मेढा पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक 6 गाव पुढारी ज्यांच्या विरोधात मेढा पोलिस स्थानकामध्ये हे प्रकरण मिटवण्यासाठी आले होते. ते सर्व राजकीय प्रतिष्ठीत गाव पुढारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पीडिताच्या अत्याचाराला महत्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सहा गाव पुढाऱ्यांना मेढा पोलिस आणि चांगलीच अद्दल घडवली