कुरुंदवाड / रवींद्र केसकर
संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने व महापुराने कुरुंदवाड शहराची आर्थिक स्थिती कोलमडली असतानाही शहरातील पाच मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामुळे कुरुंदवाडवासियांनी आपली हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारी परंपरा अबाधित ठेवत धार्मिक एकात्मतेची वीण घट्ट आहे.
येथील कुडेखान बडेनालसाहेब मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद, ढेपणपूर मशीद, या पाच मशिदीत पारंपारिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सन 1982 साली 36 वर्षांपूर्वी शहरातील पाच मशिदीत पीर व गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कै. गुलाब गरगरे, कै. दिलावर बारगीर, कै. वली पैलवान, कै. नरसू कुरणे, कै. विठ्ठल चोरगे, विलास निटवे, महादेव माळी, आप्पासाहेब भोसले, शंकर पाटील, बापूसाहेब आसंगे, तानाजी आलासे, महावीर आवळे यांच्यासह आदी मंडळींनी सुरु केली.
गणेशोत्सवाच्या काळात मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे मुस्लिम समाज गणपतीची पूजाअर्चा करत असतात 36 वर्षानंतर सन 2018 सालापासून पुन्हा एकदा गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित साजरा करण्याची पर्वणी आली होती. 2020 सालापर्यंत 3 वर्षे मशिदीत पीर आणि गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करून समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी पुजाआर्चा करत भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले.
कुरुंदवाड शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारं शहर आहे. हे प्रेम एकतर्फी नसुन मोहरमात हिंदू बांधव पिराला मोदकांचा नैवद्य दाखवून तर गणेशोत्सवामध्ये गणपतीला मुस्लीम समाजबांधव रोठांचा व मलिद्याचा नैवैद्य दाखवून भक्तिभावाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सण साजरा करत असतात.
Previous Articleराधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले
Next Article अब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी `व्हाईट मनी’ लागतो









