प्रविण दरेकरांनी महिला सुरक्षा मुद्द्यावरून साधला निशाणा
ऑनलाईन टीम / मुंबई
मुंबईत झालेल्या अत्याचार प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राउत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर देत, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडीवर विरोधी पक्षांनी चांगलेच ताश्चर्य ओढले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. तसेच याला केवळ राज्य सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अत्याचाराच्या निमित्ताने मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा पुन्हा ऐरणीवर आला असून आज मुंबई मधील महिला भयभीत झाल्या आहेत. सुरक्षित मुंबई या प्रतिमेला तडा गेला असून याला सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार असल्याचे यावेळी ते म्हणाले. वाझे सारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालणे सुरु असून पोलीसांचा प्राधान्यक्रम क्रमही बददलला आहे. स्कॉटलंडच्या तुलनेत असलेला पोलीस विभाग आता बदनाम होत आहे. तो राज्य सरकारचा नाकर्तेपणामुळेच असे ही ते म्हणाले. जर राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखीलमहाविकास आघाडीच सरकार जनता ठेवणार नाही.” असा इशारा देखील दरेकर यांनी यावेळी दिला.