गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये हद्दवाढ कृती समितीचे चर्चासत्र
गोकुळ शिरगाव / वार्ताहर
कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीत 18 गावांचा समावेश केला आहे. आपली गावे हद्दवाडी मध्ये जाऊ द्यायची की विरोध करायचा यासंदर्भात गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये हद्दवाढ कृती समितीने चर्चासत्र आयोजित केले होते. या बैठकीला अठरा गावांपैकी फक्त पाच गावातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते. इतर तेरा गावातील सरपंच उपसरपंच न आल्याने त्यांचे या हद्दवाढीला समर्थन आहे का ? अश्या चर्चेना आता उधान आले आहे.
गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दैनिकातून सतत बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यासाठी हद्दवाढ विरोधी कृती समितीने आज गोकुळ शिरगाव येथे चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये अठरा गावांपैकी पाच गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पिरवाडी, शिये, उंचगाव, कळंबा, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या चर्चेदरम्यान थोड्या गावांनी या हद्दवाडी संदर्भात समर्थता दर्शविली आहे. तर इतर गावांनी या हद्दवाढीला तीव्र शब्दात विरोध केला आहे.
यावेळी कळंबा ग्रामस्थांनी आपले गाव पूर्णपणे शेती आधारित उत्पन्नावर अवलंबून असून अजून बरीच कुटुंब ही शेतीवर अवलंबून असल्याचे सांगत जबरदस्ती कराल तर तीव्र विरोध करून ही हद्दवाढ परत पाठवू. अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. पिरवाडी ग्रामस्थांनी या हद्दवाढीला पूर्ण विरोध करत आपले गाव हद्द वाडीत सामाविष्ट करू देणार नसल्याचा निर्धार केला. उंचगाव ग्रामस्थानी सुद्धा या हद्दवाढीला तीव्र विरोध केला असून उंचगाव गाव हे महापालिका हद्दवाडीत कोणत्याही परिस्थितीत समाविष्ट करू देणार नसल्याचे सांगितले.
या चर्चेत अध्यक्षस्थानी गोकुळ शिरगावचे लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील होते. तर या चर्चेवेळी हद्दवाढ कृती समितीचे नारायण पवार, राजू माने, बाबासाहेब देवकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, साताप्पा कांबळे, गणेश काळे, धावजी पाटील, बाजीराव पाटील, अनिल शिंदे मधुकर चव्हाण,टी.के. पाटील संतोष कागले आदीसह ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे सदस्य नारायण पवार यांनी या हद्दवाढीला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला आणखीनच उधाण आले. तर या हद्दवाडीने गावचा विकास होणार असल्याचे त्यांनी आपले मत व्यक्त केले. शिवाय गावांमध्ये राजकीय आश्रयाने होणारे अतिक्रमण थांबून रस्ते मोठे होण्यास मदत होईल .त्यामुळे या हद्दवाढीला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.