ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाण्याच्या राबोडीमधील खत्री अपार्टमेंट या धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राबोडीमधील खत्री अपार्टमेंटच्या पहिल्या आणि तिसऱया मजल्यावरील स्लॅब आज सकाळी कोसळला. यात तीन रहिवाशी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमधील 75 जणांना तात्पुरत्या स्वरुपात सुखरुप स्थळी हलविले.









