वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संदेश निकम व नगरसेविका सुमन निकम यांनी ज्यांना कोरोनामुळे व्यवसाय करता येऊ शकला नाहि तसेच रोजगारा न मिळल्याने आर्थिकदृष्टय़ा अडचण निर्माण झालेल्या शहरातील गोरगरीब अशा 50 नागरीकांना प्राधान्याने गणेश चतुर्थी सणाचे औचित्यसाधून सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे मोफत वाटप केले.
यावेळी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश भोसले, मच्छीमार नेते हेमंत मलबारी, वेदांत पेडणेकर, उमेश पेडणेकर, राजन पवार, श्री. मयेकर, राजू परूळेकर, अविनाश सडवेलकर, मनोहर राऊत, श्री. मुळीक, नाना राऊत आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संदेश निकम यांनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या वेळी व्यवसाय वा रोजगारापासून वंचित राहिलेल्या नागरीकांना किराणा साहित्य असेच मोफत वाटप केले होते. तसेच मदतही केली होती.









