अभिनेत्री जरीन खानचे विधान
लोकांना चित्रपटगृहात (थिएटर) जाण्याचे कुठलेही स्वारस्य नसल्याचे आणि हे दुःखद असल्याचे अभिनेत्री जरीन खानने एका मुलाखतीत म्हटले आहे. लॉकडाउननंतर देशातील बहुतांश राज्यांमधील चित्रपटगृहे पुन्हा खुली झाली आहेत. अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहेत. तर काही चित्रपट ओटीटीचा पर्याय निवडत आहेत.

लोकांशी संवाद साधते तेव्हा ते चित्रपटगृहांमध्ये जाण्याबद्दल फारशी उत्सुकता दाखवत नाहीत. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असल्याने स्वतःच्या चित्रपटांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणे मला आवडेल, कारण तेथे अनेक लोक येतात आणि चित्रपट पाहतात असे जरीन सांगते. ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने लोकांसाठी अनेक गोष्टी अत्यंत सोप्या आणि आरामदायी केल्या आहेत. हा खरोखरच मोठा बदल असल्याचे तिने म्हटले आहे.









