प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रवादी काँग्रेस सांगली महिला आघाडीच्यावतीने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर सहा महिन्यात दाम दुप्पट केल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय जिल्हा परिषदे समोर चूल पेटवून महिलांनी निदर्शने करत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्ष डॉक्टर छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रजिस्टर पोस्टाने गोवऱ्या पाठविल्याची माहिती डॉ. छाया जाधव यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना डॉ. छाया जाधव म्हणाल्या की, या दरवाढीच्या विरोधात आम्ही सतत आंदोलने करत आलेलो आहे. पण,केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. या दरवाढीमुळं सर्वसामान्य महिलांचं बजेट कोलमडलेले आहे. त्यांना आता गॅस ऐवजी शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक करावा लागत असल्याने या गोवऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्या असल्याचेही अध्यक्ष छाया जाधव यांनी सांगितले.
यावेळी अनिता पांगम,आयेशा शेख, अमृता सरगर, वंदना सूर्यवंशी, रंजना व्हावळ,वैशाली सूर्यवंशी, शकुंतला हिंगमीरे, सोनाली सूर्यवंशी, रुक्मिणी सूर्यवंशी,सोनाली कुकडे, उषा पाटील,मीना आरते, सुनीता कुकडे, सविता सरगर,पूजा थोरात, सारिका सरगर,रेखा सूर्यवंशी, शोभा शिंदे, नेहा सूर्यवंशी, माधुरी सूर्यवंशी, योगिता सूर्यवंशी आदींसह, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.