प्रतिनिधी / करमाळा
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दोघा संचालकांनी राजीनामा दिला. संतोष पाटील व किरण कवडे असे या राजीनामा दिलेल्या विद्यमान संचालकांची नावे आहेत. पाटील व कवडे यांनी कार्यकारी संचालक यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
या राजीनाम्यात असे म्हटले आहे की, संचालक म्हणून आम्ही सभासद, कर्मचारी, तोडणी वाहतूकदार यांचा विचार करत आलो होतो. यासाठी विरोधकांशी संघर्ष देखील करावा लागला. परंतु गेली दोन वर्षे कारखान्यामध्ये कुठलेही कामकाज होत नाही, सहा महिने मिटींग देखील होत नाही, मिटींग झाली तर त्या मिटींगचे इतिवृत्त मागून देखील दिले जात नाही, बहुमताच्या जोरावर विरोधकांचा कारखाना कामकाजात मनमानी कारभार होत आहे. मागील दोन सिजन मध्ये मुबलक ऊस असून देखील कारखाना बंद ठेवण्यात आला आहे. कर्ज उभारणीसाठी बँकेकडे साधा प्रस्ताव देखील देण्यात आला नाही, तसेच साखर विक्री जाणून बुजून केली नाही.
मागील वर्षी बँकेने मालमत्ता जप्त केली व कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिला, परंतु याला देखील एक वर्षाचा कालावधी उलटला. कारखाना चालू करण्यासाठी कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. कारखाना याही वर्षी बंद राहील, कारखान्याचे सभासद, कर्मचारी, ऊसतोड वाहतूकदार यांचे अतोनात नुकसान होत आहे, हे कधीही भरून निघणार नाही, संस्थेचे होत असलेले नुकसान पाहवत नाही. यासर्व गोष्टींचा विचार करता पदावर राहण्याची इच्छा राहिली नाही, म्हणून संचालक पदाचा स्वतः हुन आम्ही दोघे स्वईच्छेनुसार राजीनामा देत आहोत, तरी आम्हाला या जबाबदारीतुन मुक्त करावे, असे संतोष पाटील व किरण कवडे यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









