ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
महागाईमूळे देशाला चांगलीच झळ बसली असून यामूळे सामान्य नागरिकांचे अर्थाजनाचे गणित कोलमडले आहे. यामूळे सामान्य नागरिक महागाईवरुन त्रस्त झाले आहेत. याच मुद्यावरुन काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी हवं तर काँग्रेसकडे मदत मागावी, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील, असे स्पष्ट करत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधानांना टोला लगावला.
राहुल गांधी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे. मोदी केवळ ४-५ उद्योगपती मित्रांना नोटाबंदीचा लाभ मिळत आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत. असे असूनही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज भारताची मालमत्ता विकली जात आहे पण हा पैसा कुठे जातो हा प्रश्न आहे, असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारला.
यावेळी राहुल यांनी नोटाबंदीचा काय फायदा झाला का ?, मेक इन इंडिया चा काय झालं ? आज नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. १९९० मध्ये सुद्धा प्रचंड अपयश आलं होतं. त्यावेळी काँग्रेसनं नवा दृष्टीकोन स्वीकारला. आजही तीच गरज आहे. काँग्रेसच्या मनात स्पष्ट कल्पना आहे. पण ही गोष्ट अर्थमंत्री, नीती आयोग, थिंक टॅक्स यांना समजतच नाही. पंतप्रधानांनी हवं तर काँग्रेसकडे मदत मागावी, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील.” अशी चपराक यावेळी मोदींना लगावली.