वार्ताहर / कुंडल
घोगाव ता. पलूस येथील आबाजी दुध उत्पादक व पुरवठा सह. सोसायटी मर्या. या संस्थेतील पावणेपाच लाखाच्या अपहार प्रकरणी संस्थेचे चेअरमन नारायण तुकाराम पाटील व व्हाईस चेअरमन जालींदर सिताराम जाधव यांना कुंडल पोलीसांनी अटक करुन पलूस येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 ता.पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. अपहार प्रकरणातील आरोपी संस्थेचे सचिव अनिल गणपती पाटील व मापाडी अतुल भगवान कांबळे यांना यापूर्वीच पोलीसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की दि. १ एप्रील २०१० ते ३१ मार्च २०१३ या काळामध्ये आबाजी दुध उत्पादक व पुरवठा संस्थेमध्ये चार लाख एक्यांऐशी हजार एकशे एकोणसाठ रुपयांचा अपहार झालेचे लेखापरीक्षणाअंती सिद्ध झालेने लेखापरीक्षक जवाहर हिंदुराव पाटील यांनी संस्थेचे चेअरमन नारायण तुकाराम पाटील व व्हाईस चेअरमन जालींदर सिताराम जाधव यांचेसह संचालक मोहन कृष्णा पाटील, अशोक विठ्ठल पाटील, अरुण राजाराम पाटील, चंद्रकांत भिमराव पाटील, कांचन गणपती पाटील, मिराबाई खाशाबा कांबळे, सचिव अनिल गणपती पाटील व मापाडी अतुल भगवान कांबळे आदी ११ जणावर आर्थिक अपहाराचा गुन्हा ११ मे २०१९ रोजी कुंडल पोलीसात दाखल केला होता.
मात्र आरोपींनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता हायकोर्टाने संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा जामिन अर्ज फेटाळल्याने कुंडल पोलीसांनी ३० आॕगस्ट रोजी अटक करुन पलूस न्यायालयात हजर केले असाता त्यांना प्रथम एक व नंतर तीन आॕगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. संजय माने करीत आहेत.