ऑनलाईन टीम / मुंबई :
ऑगस्टमध्ये जीएसटीपोटी सरकारी तिजोरीत 1 लाख 12 हजार 20 कोटी रुपये जमा झाले आहेत. ऑगस्ट 2020 च्या तुलनेत जीएसटीमध्ये 30 टक्क्मयांची वाढ झाली आहे.
जून 2021 मध्ये राज्याचे जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या खाली होते. जुलैपासून सकारात्मक परिणाम दिसून आले आणि जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींच्या वर गेले. जुलै महिन्यातील जीएसटी कलेक्शन 1.16 लाख कोटी होते. ऑगस्टमध्ये ते 1.12 लाख कोटी झाले. यात राज्याची कर रक्कम 26 हजार 605 कोटी आणि केंद्राचा वाटा 20 हजार 522 कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी 56 हजार 247 कोटी आहे. एकीकृत जीएसटीत 26 हजार 884 कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर 8 हजार 646 कोटी जमा झाला आहे. 646 कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे.