प्रतिनिधी / महाबळेश्वर
चारित्र्याच्या संशयावरून राजेंद्र महादेव जाधव वय 55 रा. व्हॅलीव्हयुवरोड प्राथमिक शाळा क्र 2 च्या मागे महाबळेश्वर या नराधमाने आज सकाळी आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकुन तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीला पेटवुन नराधम पळुन गेला असुन महाबळेश्वर पोलिस या नराधामाचा शोध घेत आहेत. दरम्यान घटना स्थळास आज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जान्हवे कराडे यांनी भेट दिली. दरम्यान महाबळेश्वर पोलीस नराधम पतीचा शोध घेत आहेत.
माणूसकीला काळीमा फासणाऱ्या एका भयंकर घटनेने आज महाबळेश्वर हादरले प्राथमिक शाळा क्र २ च्या इमारतीच्या मागे एका चाळीत वेण्णालेक येथे घोडे व्यवसाय करणारा राजेंद्र महादेव जाधव हा आपली पत्नी बायना व प्रकाश श्रीकांत व सचिन ही तीन मुले व एक मुलगी विदया असे एकत्र राहतात. राजेंद्र याला दारूचे व्यसन असुन तो रोज आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या वरून पती पत्नी मध्ये वारंवार भांडणे होत. आज सकाळी पत्नीला शिवीगाळ करत पेट्रोल अंगावर टाकले व आग लावली. पेट्रोलमुळे आग तात्काळ भडकली व पत्नीला आगीने वेढले असता तीने आरडा ओरडा सुरू केला. यावेळी नराधम पतीने घटना स्थळावरून पळ काढला. इकडे महिलेच्या किंकाळया आणि आराडा ओरडा ऐकुन चाळीतील लोक धावतच बाहेर आले बाहेरील गल्लीतील दृश्य पाहुन चाळीतील लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. क्षणभर त्यांना काय होतेय तेच समजले नाही या वेळी सचिन सपकाळ व श्रीनिवास धनपत व इतरांनी समय सुचकता दाखवित महीलेच्या अंगावर पाणी टाकुन आग विझविली
स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांनी आपल्या आईला येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी बायना जाधव यांना सातारा येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेची खबर समजतात वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितन जान्हवे कराडे यांनी आज दुपारी घटना स्थळाला भेट देवुन पाहणी केली. तसेच या घटनेच्या तपासा बाबत महाबळेश्वर पोलिसांनी मार्गदर्शन केले. संशयित आरोपी राजेंद्र जाधव याच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी भादवी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटना स्थळावरून पळुन गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी महाबळेश्वर पोलिसांनी तीन पथके तयार करून ती पथके फरार आरोपिच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याचा कसुन शोध घेत आहेत