गोडबोलेंच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्तीला मान्यता
प्रतिनिधी/कोल्हापूर
गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर आलाच नाही. त्यामुळे मोर्चा, आंदोलन करुनही जाधव यांना दिलासा मिळालेला नाही. याबाबत वरष्ठि पातळीवर चर्चा सुरु असल्याने विषय घेतला नाही. असे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले. दरम्यान कार्यकारी संचालकपदी योगेश गोडबोले यांच्या नियुक्तीला सभेत मान्यता दिली. एक महिन्याभरात ते रुजू होतील असेही चेअरमन पाटील यांनी सांगितले.
जिल्हा शिवसेना प्रमख मुरलीधर जाधव यांच्या शासन नियुक्ती संचालकपदाचा आदेश काढून दीड महिन्यानंतरही त्यांना गोकुळच्या कामकाजात सहभागी करुन घेतले नाही. शिवसैनिकांनी गोकुळवर मोर्चा काढून कार्यकारी संचालकांना जाब विचारला होता. यावेळी मंगळवारच्या सभेत ऐनवेळच्या विषयावर चर्चा करु, असे लेखी आश्वासन घाणेकर यांनी दिले होते. त्यामुळे या सभेत काय निर्णय होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.