ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने अफगाणिस्तानात 20 वर्ष शांतता राखण्याचे काम केले. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर जे अफगाणी लोक देशाबाहेर पडू इच्छित होते, अशा जवळपास 1 लाख लोकांना आम्ही बाहेर काढले. आता अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडले असले तरीही अमेरिकेची मोहिम अजून संपलेली नाही. अफगाणी नागरिकांच्या हितासाठी आम्ही अफगाण आघाडीसोबत काम करू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
बायडेन यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, काबूल विमानतळावर होणारे जिवघेणे हल्ले पाहता अमेरिकन सैन्य एक दिवस आगोदर अफगाणिस्तानातून बाहेर पडले. अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे हे एक रणनितीचा हिस्सा आहे. अमेरिकन सैन्याच्या मदतीशिवाय तालिबानी कसे उभे राहतात, मजबूत होतात ते येणारा काळ सांगेल. अफगाणी स्त्रिया, मुलांचा अधिकार हा हिंसेने नाही तर कूटनीतीने मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही बायडेन म्हणाले.