प्रतिनिधी / चलकरंजी
इचलकरंजीत अत्याधुनिक यंत्रमाग उद्योगातील नॉटिंगचे काम न दिल्याच्या रागातून रेकार्डवरील गुन्हेगाराने उद्योजकाला मारहाण केली. त्यानंतर उद्योजकाच्या यड्राव-पंचगंगा साखर कारखाना रोडवरील अॅटोलुम कारखान्यात गुन्हेगार आणि त्याच्या साथिदारांनी कोयते नाचवित प्रवेश केला. कारखान्यातील कामगारांना शस्त्राचा धाक दाखवित कारखाना बंद पाडला. कारखान्यातील अॅटोलुमचे डिस्प्ले फोडीत, काही लुमची कापडाची बिमे कापून टाकली. तर लुमवरील बिमे जाळून टाकून दुचाकीवरुन पलायन केले. या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत संबधित गुन्हेगारासह त्याच्या दोन साथिदाराच्या मुसक्या आवळल्या.
गुन्हेगार बाळू उर्फ युवराज पताडे (वय ३५), त्याचे साथिदार दाद्या अमोल भरत कसबे (वय २५), संतोष राऊ काशिद (वय ३१, तिघे रा. गणेशनगर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधी उद्योजक विवेक गौरीशंकर पांडे (मुळ रा. जोनपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. चव्हाणवाडी, कोरोची, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव करीत आहेत. अटक केलेल्या गुन्हेगार पताडे आणि त्याच्या साथिदारानी यंत्रमाग उद्योजक पांडे यांच्या अॅटोलुम कारखान्यात घुसून, सशस्त्राचा धाक दाखवित अॅटोलुमचे डिस्प्ले फोडण्याबरोबर लुमचे कापडाची बिमे कापून जाळून टाकून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. हा प्रकार बुधवारी रात्री घडला असून, यांची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









