मुंबई
विजया डायग्नोस्टिकचा भारतीय भांडवली बाजारात आयपीओ दाखल होणार आहे. सदरचा आयपीओ 1 सप्टेंबरला बाजारात खुला होणार असून 3 सप्टेंबरला बंद होणार आहे.सदरच्या इशुअंतर्गत मात्र कोणतेही नवे समभाग सादर होणार नाहीत. 3.56 कोटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जाणार आहेत. सदरच्या इशुसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ऍडलेव्हाइस फायनॅन्शीयल सर्व्हिसेस व कोटक महिंद्रा कॅपिटल यांना गुंतवणूक बँकर्स म्हणून कंपनीने नेमले आहे.









