नवी दिल्ली
बोल्टने (Boult)भारतामध्ये आपला नवीन ईयरफोन सादर केला आहे. हा ऑडिओच्या प्रोबेस क्यूचार्ज नेकबँड स्टाईलमधील आहे. यामध्ये ईयरफोनच्या बॅटरीचा बॅकअप 24 तास राहणार असल्याचा दावा केला आहे. बोल्टच्या या इयरफोनमध्ये युएसबी टाईप सी पोर्टच्या आधारे फास्ट चार्जिंगची सुविधा मिळणार आहे.
अन्य फिचर्स
ईयरफोनला तीन रंगामध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन आदीचा समावेश आहे. तर याची किमत ही 1,999 रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.









