मुंबई \ ऑनलाईन टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात अटक असलेला आरोपी आणि निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली आहे. कुटुंबीयांना भेटण्याच्या परवानगीसह काही मागण्यांसाठी वाझे यांनी अर्ज केला आहे.
सचिन वाझे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्याचबरोबर घरच्या सदस्यांना भेटण्याची आणि घरचे जेवण मिळण्याबाबतही परवानगी मागितली. सचिन वाझेंच्या वकिलांनी एनआयए कोर्टात यासंबंधी अर्ज केला आहे.
दरम्यान, एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी वाझेची कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र इतर दोन अर्ज म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचार आणि घरच्या जेवणासंदर्भात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सचिन वाझे यांना तीन हार्ट ब्लॉकेजेस असून बायपास करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








