नवी दिल्ली\ ऑनलाईन टीम
अपूर्व चंद्रा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. याआधी अपूर्व चंद्रा यांनी १ ऑक्टोबरपासून कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणून सप्टेंबर २०२० मध्ये संसदेने मंजूर केलेल्या कामगार संहितेच्या त्वरित अंमलबजावणीच्या आदेशावर काम केले आहे. चारही कामगार संहितांवर सर्व संबंधितांशी सविस्तर सल्लामसलत करून नियम तयार करण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. नियमित पगार क्षेत्रातील ७८.५ लाख कामगारांना रोजगार संधी पुरवण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु करण्यात आली.
अपूर्व चंद्रा यांनी संरक्षण मंत्रालयात संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी पार पाडली आहे. ह्या कारकिर्दीत त्यांनी शस्त्रास्त्रांच्या अधिग्रहणाची प्रक्रिया व्यवस्थित राबवत लष्कराला बळकटी आणण्याची कामगिरी पार पाडली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









