ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव कमी होत असताना देशभरासह राज्यात तिसऱया लाटेचे संकट कायम आहे. अशा परिस्थिती आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारने नियमावली व निर्बंध जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आगामी दहीहंडी सणाला परवानगी नाकारण्यात आलेली असून गणेशोत्सवावरही बंधन घालण्यात आली आहेत.
2020 मध्ये कोरोनामुळे गणेशोत्व सरकारी नियम आणि बंधनांमध्येच साजरा करावा लागला होता. आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गतवषीची नियमावली यंदाही कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवासाठी भाविकांना दर्शनाची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.
- अशी आहे गणेशोत्सवासाठी सरकारी नियमावली :
1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसाठी उंचीची मर्यादा 4 फूट
2) घरगुती गणेशमूर्तीची मर्यादा 2 फूट
3) गर्दी होणार नाही याची काळजी स्थानिक गणेशोत्सव मंडळांनी घ्यायची आहे.
4) शहरातील 84 नैसर्गिक ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. तिकडे महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल, त्यानंतर महापालिका गणेश मूर्तीचं विसर्जन करेल.
5) मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी
6) सार्वजनिक मंडळाच्या विसर्जनाला 10 कार्यकर्त्यांना परवानगी
7) लहान मुलं आणि ज्येष्ठांनी विसर्जनासाठी जाऊ नये.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, असा संदेश दिला आहे.








