प्रतिनिधी / सातारा :
केंद्र शासनाने हॉल मार्कचा केलेला कायदा हा व्यापाऱ्यांना कारकुन बनवणारा आहे. तो कायदा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सातारा सराफ कट्टा बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात सातारा शहरातील 200 व्यावसायिक सहभागी झाले होते. तब्बल 2 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
सातारा शहरातील सराफ असोसिएशनच्यावतीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानुसार आज सराफ पेढी बंद होती. सराफ असोसिएशनच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. यामध्ये चंद्रशेखर घोडके यांच्यासह प्रमुख मान्यवर सहभागी झाले होते. सातारा शहरातील 200 व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने स्लॅक सिजनमध्ये सातारा शहरात सराफी पेढय़ात 2 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. ही उलाढाल ठप्प झाली आहे. सरकारने हा कायदा मागे घ्यावा, किंवा कारकुनकीचे काम तरी द्यावे, अशी मागणी व्यापारी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.









