मुंबई \ ऑनलाईन टीम
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत आणि ते पर्यायाच्या शोधात आहेत, असं वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. आता नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणे यांना सूक्ष्म खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे, अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची विचारणा करण्यात आली. यावेर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे, अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली.
पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत हवामान खात्याप्रमाणे अंदाज चुकीचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








