- पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या
ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयाने आत्महत्या केल्याची माहीती समोर आली आहे. निखिल धोत्रे असे या तरुणाने राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवले.
मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर भागात निखिल वास्तव्यास होता. आत्महत्या करण्यापूर्वी निखिलने लिहिलेली सुसाईट नोट मिळाली असून या नोटमध्ये त्याने, सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
- सुसाईड नोटमध्ये केली ‘ही’ मागणी
गेल्यावर्षीच निखिलचे लग्न झाले होते. निखिलने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवले. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून यामध्ये त्याने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच कर्जबाजारी झाल्याचाही उल्लेख केला आहे. निखिलने पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे’, असेही चिठ्ठीत लिहिले आहे.