प्रतिनिधी / शिराळा
आरळा व सोनवडे (ता. शिराळा) येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आरळा येथील हसिना रमजान मुल्ला, पुनम ज्ञानदेव भोसले, निर्मला विजय भोसले, संगीता संजय भोसले, साधना विष्णू गुंजाळ, शशिकला नामदवे भोसले यांच्यासह ६ महिला कार्यकर्त्यांनी तर, सोनवडे येथून संगीता उदय बाबर, मनीषा विलास बाबर, कमल चंद्रकांत बाबर, मीना रविंद्र खंडागळे व सुनिता पाटील यांच्यसह २६ महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. यावेळी सुनितादेवी नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व भूषण नाईक प्रमुख उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








